भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू   

काठमांडू : हिमालयातील जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माउंट ल्होत्से सर केल्यानंतर एका भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. ही माहिती मीडिया रिपोर्टस मधून समोर आली आहे.
 
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राकेश बिश्नोई यांनी सोमवारी ल्होत्से शिखरावरून परतल्यानंतर कॅम्प-४ जवळील यलो बँडमध्ये अखेरचा श्वास घेतला. एका नेपाळी गिर्यारोहकाने सांगितले, की बिश्नोई यांनी रविवारी माउंट एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि ल्होत्से पर्वत चढला. लँडिंग करताना त्यांचा यलो बँडजवळ मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अहवालात म्हटले आहे. माउंट ल्होत्से हे शिखर समुद्रसपाटीपासून आठ हजार ५१६ मीटर उंचीवर आहे. माउंट एव्हरेस्ट, के२ आणि कांचनजंगा नंतर हे पृथ्वीवरील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे

Related Articles